आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Sanju':संजयच्या ख-या आयुष्यातीली 'कमलेश' कोण? बदलले आहे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'संजू' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राजकुमार हिरानीच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशीच कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 34.75 कोटींची कमाई केली. तर दूस-या दिवशी चित्रपटाने 73 कोटींचा गल्ला जमवला आहे. संजयच्या ख-या आयुष्यातील अनेक गोष्टी या चित्रपटातून उलगडल्या आहेत. या चित्रपटातील कमलेश तर सर्वांना लक्षात राहतोच. हा या चित्रपटात संजयचा बेस्ट फ्रेंड दाखवला आहे. अभिनेता विकी कौशल याने ही भूमिका साकारली आहे. परंतू ख-या आयुष्यात संजयच्या आयुष्यात कमलेश नाही. तर परेश गिलानी आहेत.  

 


कोण आहेत परेश गिलानी
परेश गिलानी, अमेरिकेत  बीपीजी मोर्टस सीईओ, चेअरमन आहेत ते एक यशस्वी बिझनेसमन आहेत. इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टमध्ये काम करणे हेच त्यांचे काम आहेत. सध्या ते मून एक्सप्रेस, डिव्हीडी मोटार कॉर्पोरेशन, व्हायएम इनकॉर्पोरेशन आणि केस पॉइंटसाठी काम करत आहेत. ते आपल्या बिझनेस करिअरमध्ये यशस्वी आहेत. नुकतेच ते भारतात एक प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. रतन टाटासोबत हे काम करत आहेत. भारतातील गावांमधील पाण्याची समस्या ते सोडवणार आहेत. 

 

कुठे झाली संजयची भेट
परेश हे गुजराती कुटूंबातून आहेत. परंतू त्याचा जन्म यूएसमध्ये झाला आहे. तिथेच त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. येथे त्यांनी प्रोफेशन लाइफ सुरु झाली. संजय दत्त आणि त्यांची भेट न्यूयॉर्कमध्ये झाली. या काळात संजय दत्तच्या आई नर्गिस दत्त यांच्यावर उपचार सुरु होते. या काळात परेश संजयचे फॅन म्हणून आले होते. त्यानंतर दोघांची मैत्री वाढली. चित्रपटात कमलेशला कमली हे पेटनेम देण्यात आले होते. तर रिअल लाइफमध्ये परेशला पाडिया हे नाव देण्यात आले होते. चित्रपटामध्ये कमलेश रेड कलरचा जॅकेट घातलेला दाखवण्यात आले होते. परंतू ख-या आयुष्यात संजय दत्तने त्याला एक रेड कलरचा शर्ट दिलेला होता.

बातम्या आणखी आहेत...