आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nagarjuna Younger Son Akhil Akkineni Ex Fiancee Shriya Bhupal Ties The Knot With Apollo Chairperson Grandson

फॅशन डिझायनर श्रिया भूपलने केले लग्न, पत्नी अमृतासोबत पोहोचले दिग्विजय सिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद/मुंबई : श्रिया भूपलने हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये अपोलोचे चेअरमन प्रताप रेड्डीचा नातू अनिंदित रेड्डीसोबत लग्न केले आहे. श्रिया आणि अनिंदितचा साखरपुडा एप्रिल 2017 मध्ये झाला होता. नंतर या कपलने फ्रान्समध्ये लग्न केले होते. आता हैदराबादमध्ये पुर्ण प्रथा-परंपरांसोबत श्रिया आणि अनिंदितने लग्न केले. लग्नामध्ये श्रियाने डिझायनर तरुण तहिलियानीची पिंक साडी आणि डायमंड ज्वेलरी घातली होतीत. तर अनिंदित मॅचिंग शेरवानीमध्ये दिसला. या कपलच्या लग्नात अमृता रायसोबतच क्राँग्रेस नेता दिग्विजय सिंह, पत्नी उपासना कमिनेनीसोबत रामचरण तेजा, सानिया मिर्जा, नम्रता शिरोडकरसोबतच अनेक साउथ स्टार्स पोहोचले. श्रिया भूपल ही बिझनेस टायकून जीवीके रेड्डीची नात आहे. यापुर्वी श्रिया हिचे लग्न नागार्जुनचा लहान मुलगा आणि तेलुगु अॅक्टर अखिल अक्किनेनीसोबत ठरले होते.


भांडणामुळे मोडले श्रिया आणि नागार्जुनचे लग्न...
- श्रिया आणि अखिल अक्किनेनी यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. नंतर त्यांनी डिसेंबर 2016 मध्ये साखरपुडा केला. परंतू नंतर भांडणांमुळे फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांचे लग्न मोडले.
- रिपोर्ट्सनुसार, साखरपुड्याच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये हैदराबाद एयरपोर्टवर खुप भांडण झाली होती. यानंतर दोघंही अपसेट होते. याचमुळे अखिल आणि श्रियाने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता.
- नागार्जुन आणि जीवीकेने दोघांना समजावण्याचा प्रयत्नदेखील केला होता. परंतू अखिल आणि श्रियाने नाते संपवले.

रोममध्ये होणार होते श्रिया-अखिलचे लग्न, भारतामधून जाणार होते 700 पाहूणे
- श्रिया आणि अखिलचे लग्न इटलीमध्ये होणार होते. इटलीमध्ये सर्व तयारी पुर्ण झाली होती. हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंगही झाली होती.
- लग्नासाठी जवळपास 700 गेस्ट्स भारतातून इटली येथे जाणार होते. परंतू साखरपुडा कन्सल केल्यानंतर सर्वांचा प्रोग्राम कँन्सल करण्यात आला.

 

फॅशन डिझायनर आहे श्रिया भूपल
- श्रिया बिझनेस टायकून जीवीके रेड्डीची नात आहे. यासोबतच ती हैदराबादची फॅशन डिझायनर आहे. यासोबतच ती साउथ फिल्मफेयरची ऑफिशियल कॉस्ट्यूम डिझायनरही आहे.
- श्रियाने टॉलिवूडची हिरोइन श्रिया सरन, काजल अग्रवाल, रकुल प्रीतसोबतच बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूर, आलिया भट्टसोबत कामही केले आहे.
 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पारा श्रिया भूपलच्या लग्नाचे फोटोज...