आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mom श्रीदेवीसोबत ओळखीच्या अंकलच्या ऑफिसमध्ये 3 दिवस राहावे लागले होते, जान्हवीने ऐकवला किस्सा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूर स्टारर 'धडक' हा चित्रपट 20 जुलै रोजी बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका प्रमोशनल मुलाखती दरम्यान तिने तिच्या वयक्तीक आयुष्याविषयी रंजक किस्सा शेअर केला. मुलाखती दरम्यान पावसाचा विषय निघाला. यावर तिला 2005 मध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि पुराची आठवण झाली. तिने सांगितले की, ती आईसोबतचित्रपट पाहण्यासाठी गेली होती आणि तीन दिवस घरी परतू शकली नव्हती.

 

ओळखीच्या अंकलच्या ऑफिसमध्ये मॅगी खाऊन काढले होते ती दिवस
- जान्हवीने सांगितले "मी, माझी आई, माझी मैत्रीण आणि तिची आहे. आम्ही चौघी चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. शो संपल्यानंतर बाहेर येऊन बघितले तर सगळीकडे पुराचे पाणी होते. आम्हाला घरी जाता येत नव्हते. आमच्या ओळखीच्या राज अंकलचे ऑफिस तिथे जवळ होते म्हणून चांगले झाले. तीन दिवस आम्ही त्याच ऑफिसमध्ये मॅगी खात दिवस काढले." 
- आई श्रीदेवी आता जान्हवी कपूरसोबत नाहीत. 24 फेब्रुवारी रोजी दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...