Home | News | 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करताना कॅमे-यात बंदिस्त झाल्या आहेत या 10 पाकिस्तानी अॅक्ट्रेसेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 15, 2018, 07:08 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच आपला शेजारचा देश पाकिस्तानातील अभिनेत्रीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करता

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  एन्टरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच आपला शेजारचा देश पाकिस्तानातील अभिनेत्रीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करताना दिसतात. 'बिग बॉस' शोनंतर बॉलिवूडमध्ये करिअर करणारी अभिनेत्री वीणा मलिक आज दोन मुलांची आई आहे. मात्र लग्नापूर्वी तिचे आयुष्य बरेच वादग्रस्त ठरले होते. वीणा अनेकदा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना आणि दारु पिताना दिसली आहे.

  चॅट शोमध्ये शाहरुखच्या हीरोईनने मागितली होती सिगारटे...
  'रईस' या सिनेमातून पाक अॅक्ट्रेस माहिरा खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. VJ हून अभिनेत्री बनलेली माहिरा चेन स्मोकर आहे. 2016 मध्ये माहिराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये TUC नावाच्या चॅट शोमध्ये ती अभिनेता फवाद खानची मुलाखत घेत होती. या मुलाखतीदरम्यान माहिरा फवादला सांगते, "मला सिगारेट ओढायची आहे." यावर फवाद तिला बाहेर जाऊन स्मोक करायला सांगतो. इतकेच नाही तर गेल्यावर्षी माहिरा अभिनेता रणबीर कपूरसोबतही सिगारेट ओढताना आढळली होती.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करणा-या पाक अभिनेत्रींविषयी...

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  2014 मध्ये इमरान खानच्या 'राजा नटवरलाल' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री हुमैमा मलिकसुद्धा स्मोकिंग करताना आढळली आहे. हुमैमा ब-याच पाकिस्तानी मालिका आणि सिनेमांत झळकली आहे.  

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  2003मध्ये आलेल्या 'तुम यही कहना' या टीव्ही शोमधून डेब्यू करणारी पाक अॅक्ट्रेस आयशा खानलासुद्धा सिगारेटचे व्यसन जडले आहे. टीव्ही शोजसोबत ती 'वार', 'जवानी फिर नहीं आनी' या सिनेमांत झळकली आहे.  

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  पाक अॅक्ट्रेस आणि टीव्ही प्रेजेंटर सनम बलोचसुद्धा स्मोकिंग करताना आढळली आहे. सनमने 'सनम स्मॉल रूम' आणि 'दियो' हे गाजलेले टीव्ही शोज होस्ट केले आहेत. 

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  अफेअर्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अँकर आणि होस्ट सना तारीक अनेकदा पब्लिकली सिगारेट ओढताना दिसली आहे.  

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  लाहौरची रहिवाशी असलेली जर्नालिस्ट आणि अॅक्ट्रेस मीरा सेठीलासुद्धा स्मोकिंगचे व्यसन जडले आहे. ती 'मोहब्बत सुख का सितारा है', 'प्रीत न करियो कोई' या टीव्ही शोजमध्ये झळकली आहे.  

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  मॉडेल आणि अॅक्ट्रेस नौशीन शाहने अनेक टीव्ही शोजमध्ये झळकली आहे. नौशीन अनेकदा सिगारेट आणि दारु पिताना आढळली आहे.  
   
 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  कराचीची अॅक्ट्रेस आमना इल्यास (26) ने 'तुम मेरे पास रहो' या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळवली आहे. आमनालादेखील सिगारेटचे व्यसन आहे.  
   
 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकलेली पाकिस्तानी मॉडेल आणि सिंगर अय्यनसुद्धा स्मोकिंग करते. तिने 'Earthquake', 'Making Dollars feat. Timo', 'You and I feat. F.Charm' या गाण्यांतून लोकप्रियता मिळवली आहे.  

 • 10 Photos: Pakistani Actress Caught Drinking And Smoking

  2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सनम तेरी कसम' या सिनेमातून बी-टाऊनमध्ये डेब्यू करणारी पाक अभिनेत्री मावरा होकेनला पब्लिकली ड्रिंकिंग करताना बघितले गेले आहे. एका खासगी पार्टीत भरपूर ड्रिंक केल्यानंतर डान्स करतानाचे तिचे फोटोज व्हायरल झाले होते.  

Trending