आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 नोव्हेंबरला रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारचा '2.0' चित्रपटाची रिलीज डेट रिव्हिल झाली आहे. पहिले हा चित्रपट 2018 मध्ये अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' चित्रपटापुर्वीच रिलीज होणार होता. फेब्रुवारीनंतर वृत्त आले की हा चित्रपट दिवाळीला रिलीज होईल. परंतू चित्रपटाच्या वीएफएक्स कामात उशीर झाल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा पुन्हा बदलली जात होती. 


नोव्हेंबरमध्ये दिसणार सायन्स मॅजिक
2.0 चित्रपटाच्या प्रोडक्शन कंपनीने सोशल मीडियावर चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. हा चित्रपट याच वर्षी 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यासोबतच 23 वर्षानंतर रजीनीकांतचे 2 चित्रपट एकाच वर्षी रिलीज होत आहेत. चित्रपटाच्या मेकर्सने या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले आहे. यामध्ये एक मोठा गरुड दिसतोय.
- पोस्टरमध्ये दिसत असणा-या गरुडाच्या भूमिकेविषयी सध्यापर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही. पहिले रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार, रजनीकांत आणि एमी जॅक्सन दिसले आहे. 


2018 चा बिग बजेट चित्रपट

2.0 हा चित्रपट 2018 चा सर्वात जास्त बजेट असणारा चित्रपट आहे. चित्रपटाचे बजेट 450 कोटीपर्यंत आहे. 100 कोटी वीफक्स काम वाढल्यामुळे असे झाले आहे.
- रोबोट 2.0 चे वीएफएक्स श्रीनिवास मोहनच्या देखरेखीखाली तयार होतेय. श्रीनिवास मोहनने बाहुबलीचा वीएफएक्स तयार केले होते.

बातम्या आणखी आहेत...