आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 65th National Awards Winner List 65 वे राष्ट्रीय पुरस्कार

हिंदीत ‘न्यूटन’, तर मराठीत ‘कच्चा लिंबू’ सर्वोत्कृष्ट; मराठी दिग्दर्शकांचा सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी झाली. यात हिंदीमध्ये अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटाला रजत कमळ मिळाले, तर मराठीत प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाने बाजी मारली. ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत प्रतिष्ठित समजले जाणारे सुवर्णकमळ ‘व्हिलेज रॉकस्टार’ या आसामी चित्रपटाने पटकावले. दरम्यान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या त्यांच्या शेवटच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 


नवी दिल्लीत शास्त्री भवनात शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारांची घोषणा केली. या निवड समितीमध्ये गीतकार महबूब, राजेश मापुसकर, त्रिपुरारी शर्मा आदींचा समावेश होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ३ मे रोजी एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

 

‘मॉम’चा गौरव

कारकीर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या शेवटच्या ‘मॉम’ (२०१७) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. १९८९ मध्ये ‘चांदनी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मात्र, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिळालेला हा त्यांचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार.

 

खन्ना यांना फाळके पुरस्कार

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना मरणोत्तर  दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. गेल्या वर्षी दीर्घ आजारामुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. १९७० च्या दशकात आपल्या अिभनयाची छाप पाडणाऱ्या विनोद खन्ना यांनी नंतरच्या काळात राजकीय कारकीर्द गाजवली होती.

 

इतर श्रेणींतील पुरस्कार

- सर्वोत्कृष्ट लघुपट : सुयश शिंदे
- प्रमोशनल : राजेंद्र जंगले -चांदेरीनामा
- विशेष उल्लेखनीय : यशराज कऱ्हाडे -म्होरक्या 
- ध्वनिमुद्रण : अविनाश सोनावणे -पावसाचा निबंध
- नृत्यदिग्दर्शन : गणेश आचार्य - गोरी तू लाथ मार, टॉयलेट एक प्रेमकथा.
- पार्श्वसंगीत : ए. आर. रेहमान (मॉम) 
- साहसी दृश्ये : अब्बास अली मोगल -(बाहुबली २) 
- स्पेशल इफेक्ट्स : बाहुबली २ 
- विशेष उल्लेखनीय : पंकज त्रिपाठी -न्यूटन
- सहकलाकार : दिव्या दत्ता -इरादा

 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर.. 

- नर्गिस दत्त अवॉर्ड ऑफ बेस्ट फिचर फिल्म ऑन नॅशनल इंटिग्रेसन या श्रेणीत निपुण धर्माधिकारीच्या 'धप्पा' या चित्रपटाला  पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि दीड लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  

- यशराज कु-हाडे यांच्या  'म्होरक्या' या मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट असे दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. 

- सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत' या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.  

 

नागराज मंजुळेंच्या लघुपटाचा गौरव...

सैराट या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'पावसाचा निबंध' या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.

 

'व्हिलेज रॉकस्टार' या आसामी चित्रपटाला सुवर्णकमळ...

 - 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळचा मान पटकावला तो  'व्हिलेज रॉकस्टार' या आसामी चित्रपटाने.  सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  - - रिमा दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. 

- याच चित्रपटातील भूमिकेसाठी बनिता दासला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. 

 

'बाहुबली द कन्क्लूजन' ठरला बेस्ट पॉप्युलर सिनेमा... 

- बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेल्या 'बाहुबली द कन्क्लूजन'' या चित्रपटाला बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेन्मेंट या श्रेणीत सुवर्णकमळ घोषित झाले आहे. दोन लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. 

- याच चित्रपटासाठी अब्बास अली मोगल यांना सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 

 

अभिनेते-दिग्दर्शक शेखर कपूर निवड समितीचे अध्यक्ष...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

 

एक नजर टाकुया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांवर...

 

> सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू

> सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - मोरक्या (मराठी चित्रपट)

> स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे

> सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग

> सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे

> सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

 

बॉलिवूडमधील पुरस्कार :

>  दादासाहेब फाळके पुरस्कार - विनोद खन्ना

> सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन (निर्माता - अमित मसुरकर)

> सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं - अब्बास अली मोगल - (बाहुबली 2)

> सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2

> सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार - टॉयलेट एक प्रेम कथा)

> सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन

> स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)


इतर पुरस्कार :

> सर्वोत्कृष्ट गाणं - ए.आर. रहमान - मॉम 

> सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - तामिळ चित्रपट Kaatru Veliyidai 

> स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा

> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण - वॉटर बेबी - पिया शाह

> सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग

> सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती - गिरीजादेवी डॉक्युमेंट्री

> सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी - लद्दाखी चित्रपट वॉकिंग विथ द विंड्स 

> सर्वोत्कृष्ट साऊंड अॅण्ड सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग - लद्दाखी चित्रपट वॉकिंग विथ द विंड्स 

> सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टीस्ट -  रामराजक  (चित्रपट नगर किर्तन) 

> सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - डीएचएच 

> सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट - टु लेट 

> सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट - आशु 

> सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट - मयुराकांशी 

> सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - हेब्बेटु रामाक्का Hebbettu Ramakka

> सर्वोत्कृष्ट थुलु चित्रपट - पड्डायी 

> सर्वोत्कृष्ट लद्दाखी चित्रपट - वॉरिंग विथ द वाईंड्स 

> सर्वोत्कृष्ट ओडीसी चित्रपट - हॅलो आरसी 

 

बातम्या आणखी आहेत...