आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

102 Not Out: 27 वर्षांनंतर एकत्र दिसणार 'अकबर आणि एंथोनी', पाहा टीजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे. 1991 मध्ये त्यांनी 'अजूबा' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. आता हे दोघं आगामी चित्रपट '102 नॉट आउट' मध्ये एकत्र दिसणार आहेत. यामध्ये दोघांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज झालाय. चित्रपटात ऋषि कपूर आणि अमिताभ बच्चन यांची चांगली केमेस्ट्री पाहायला मिळतेय. ऋषि कपूर आणि बिग बी ओल्डेज होमच्या कथेला मजेदार अंदाजार घेऊन येत आहेत. 

 

टीजरमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर मस्तीखोर अंदाजात दिसत आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन ऋषि कपूर यांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे लेखक सौम्या जोशी आहेत. हा चित्रपट 4 मे 2018 ला रिलीज होणार आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या चित्रपटाचा टिजर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...