आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju : \'संजू\'तील दुसरी बाजूही मुलांना अवश्य दाखवावी, योगश सोमण यांची परखड भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : रणबीर कपूर स्टारर आणि संजय कपूरच्या आयुष्यावर आधारित 'संजू' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर कोटींच्याकोटी उड्डाने गाठत आहे. चित्रपटाने तब्बल 3 दिवसांतच 100 कोटींचा आकडा ओलांडला आहे. चित्रपटाची चोहीकडे प्रशंसा सुरु आहे. परंतू ही प्रशंसा सुरु असतानाच दुसरीकडे दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमन यांनी 'संजू'वर सडकून टिका केली आहे.


योगेश सोमन यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाबद्दलचे त्यांचे परखड मत मांडले आहेत. संजय सुनील दत्त याला त्यांनी कसा देशद्रोही आणि हरामखोर व्यक्ती असल्याचे स्पष्ट शब्दात म्हटले आहे. हा चित्रपट आपल्या मुलांना पाहण्यापासून आपण थांबवू शकत नाही. त्यांना कुठे ना कुठे हा चित्रपट पाहायला मिळणारच आहे. यामुळे आपण मुलांना संजय दत्त कसा देशद्रोही होता, त्यांच्याविषयी काय बातम्या होत्या, त्याची व्यसनाधिनता याची दूसरी बाजूही दाखवायला हवी. अन्यथा उद्या आपला मुलगा नशा करुन घरी येईल तेव्हा आपण त्याला सुनील दत्तप्रमाणे मिठीत घेणार आहोत का, आपण असे करायला खासदार नाही किंवा संजय सारखी आपली मोठी बहिणही खासदार नाही. आपण सामान्य कुटूंबातील सामान्य लोक आहोत. यामुळे आपल्या मुलांना या चित्रपटाची दूसरी बाजू कळणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही संजय सारख्या व्यक्तीवर आधारित चित्रपटांची स्तुतीसुमण उधळू नका असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...