आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Actress Usasi Misra Went To Performing The Stage Show People Tried To Tear Her Cloth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परफॉर्मन्सनंतर ‘या’ अभिनेत्रीला लोकांनी घेरले, कपडेही फाडण्याचा केला प्रयत्न!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः ओडिसाची प्रसिद्ध अभिनेत्री उसासी मिश्रा हिच्यासोबत अलीकडेच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्याचे झाले असे की, ती एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करण्यासाठी पोहोचली होती. मात्र याठिकाणी तिला फिजिकल हॅरेसमेंटचा सामना करावा लागला. तिने या प्रकरणी पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर उसासीने सोशल मीडियावर एक व्हिडिओदेखील शेअर केला, ज्यामध्ये ती तिच्यासोबत घडलेली घटना सांगताना दिसत आहे.


तीन लोकांनी घेरले आणि कपडे फाडण्याचा केला प्रयत्न... 
- ईस्टर्न ब्लू ओपेरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उसासी डान्स परफॉर्मन्ससाठी पोहोचली होती.  मात्र अचानक तिथे तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. 
- उसासीने सांगितलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या शनिवारी ती अंगुल जिल्ह्यातील डेरांग या गावी एक शो करण्यासाठी पोहोचली होती. ज्याठिकाणी तीन लोकांनी तिला घेराव घातला होता. विशेष म्हणजे, त्यांनी माझ्या अंगावरील कपडेही फाडण्याचा प्रयत्न केला, असे तिने म्हटले आहे.

- उसासीने तिच्या तक्रारीत इंद्रमणी साहू आणि त्याच्या दोन मुलांवर छेडछाडीचा आरोप केला आहे. 
- व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, ‘हा विचार करूनदेखील माझा थरकाप होतो की, कशा पद्धतीने या तीन लोकांनी मला घेरले होते. माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री सुमारे 11.45 वाजेदरम्यान घडली.’ यावेळी उसासीने तिन्ही संशयित आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
- त्याचबरोबर तिने म्हटले की, ‘मी तायक्वांदो शिकली आहे, त्यामुळेच मी या घटनेतून स्वतःचा बचाव करु शकली.’

- पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

 

पुढील स्लाईडवर बघा, उसासी मिश्राचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...