आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teaser Out: \'फन्ने खां\'चे टीजर रिलीज, या लूकमध्ये दिसले ऐश्वर्या आणि अनिल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : डायरेक्टर अतुल मांजरेकरचा आगामी चित्रपट 'फन्ने खां'चा टीजर रिलीज झाला आहे. याच्या बॅकग्राउंडमध्ये राजकुमार रावचा आवाज ऐकायला येतोय. तो सांगतोय की, फन्ने खांचा अर्थ हरहुन्नरी असा असतो. चित्रपटाची कथा अशा फन्ने खां(अनिल कपूर)ची आहे, ज्याने या नावाची कथाच बदलून टाकली. 57 सेकंदाच्या टीजरमध्ये ऐश्वर्या फक्त 3 सेकंद झळकली आहे. राजकुमार रावही तेवढाच वेळ दिसला. परंतू अनिल कपूरला दोघांच्या तुलनेत जास्त काळ दिला आहे. ते जवळपास 10 सेकंद दिसले आहेत. अनिल कपूर टीजरमध्ये लूंगी आणि टी-शर्टमध्ये अॅक्ट्रॅक्ट करत आहे. 


अनिल कपूर यांनी ट्वीटवर शेअर केला टीजर...
अनिल कपूर यांनी चित्रपटाचा टीजर शेअर करत लिहिले की, "Jo khud apni kahani likhe woh hi hai #FanneyKhan..." हा चित्रपट 2000 मध्ये आलेल्या बेल्जिअमच्या सटायरियल फिल्म 'Everybody's Famous' चा ऑफिशिअर रीमेक आहे. 


3 ऑगस्टला रिलीज होणार चित्रपट
- हा चित्रपट 3 ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ऐश्वर्या राय चित्रपटात एका पॉप स्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी वृत्त होते की, ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे लिरिक्स ऐश्वर्याला आवडलेले नाही. यानंतर हे लिरिक्स बदलण्यात आले. ऐश्वर्याच्या गाण्याची शूटिंगही पुन्हा करण्यात आली.

 

बातम्या आणखी आहेत...