आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोल्ड' चा टीजर रिलीज, हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसला अक्षय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा गोल्ड या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झालाय. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा टीजर पोस्ट केलाय. यामध्ये अक्षय हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसतोय. चित्रपटाची कथा 1946 ते 1948  या काळातील आहे. अक्षय या चित्रपटात बंगाली आणि भारतीय हॉकी खेळाडूची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती यांनी केलेय. चित्रपटाचा फर्स्ट लुक त्यांनी ब-याच दिवसांपुर्वीच रिलीज केला होता. अशी आहे चित्रपटाची कथा...


- भारताने ऑलंपिकमध्ये जिंकलेल्या सर्वात पहिल्या गोल्ड मेडलची ही कथा आहे.
- 1948 मध्ये स्वतंत्र भारताने पहिल्यांदा ऑलंपिकमध्ये सहभाग घेतला होता. 
- यावर्षी 15 ऑगस्टला हा चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.
- या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय चित्रपट सृष्टीत पदार्पण करतेय. मौनी दिर्घकाळपासून टीव्हीवर काम करतेय. 
- अक्षय कुमार या चित्रपटात हॉकी टीमचे कप्तान राहिलेल्या बलवीर सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 
- कुणाल कपूर अक्षयसोबत सोपर्टिव रोलमध्ये आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'गोल्ड' चा ट्रेलर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...