आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफची बेगम करीनाला पुन्हा करायचे आहे लग्न, वाचा असे का म्हणाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूर आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मानुषी करीनासोबत आपल्या लग्नाचा प्लान शेअर करतेय. पुर्ण प्लान ऐकल्यानंतर करीना इतकी इम्प्रेस होते की, म्हणते "मलाही लग्न करायचे आहे." तेव्हा मानुषी तिला आठवण करु देते की, तु पहिलेच विवाहित आहे. करीना कपूरचे 2012 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न झाले. तिला 1 वर्षांचा तैमूर हा मुलगा आहे. 


एका ज्वेलरी ब्रांडचा प्रमोशनल व्हिडिओ...
- करीना ज्या व्हिडिओमध्ये लग्नाविषयी बोलतेय. हा व्हिडिओ एका ज्वेलरी ब्रांडचा प्रमोशनल व्हिडिओ आहे. जाहिरातीत दाखवण्यात आलेय की, मानुषी आणि करीना एका लग्नात गेले आहे, जे लग्न खुप बोरिंग आहे. यावेळी मानुषी म्हणते की, मला जेवण चांगले वाटतेय. करीना म्हणते की, जेव्हा लग्न बोरिंग वाटते तेव्हा सर्व असेच म्हणतात. यावेळी करीना मानुषीला विचारते की, तुझे लग्न कसे होईल. तेव्हा मानुषी उत्तर देते की, एका मोठ्या उत्सवाप्रमाणे होईल.


'वीरे दी वेडिंग' मधून कमबॅक करत आहे करीना
- करीना कपूर सध्या आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या शूटिंगवर आहे. शशांक घोषच्या डायरेक्शनमध्ये तयार होणारा हा चित्रपट 1 जून 2018 ला रिलीज होईल. चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानियाची प्रमूख भूमिका आहे. करीना, सोनम आणि इतर स्टार्सने नुकतेच यामधील एका गाण्याची शूटिंग केली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


हे फोटो तुम्ही पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...