आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये काका अनिल कपूर यांना पाहताच जान्हवीने पडले पाय, अशी होती दोघांची बॉन्डिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट 'धडक'चा ट्रेलर सोमवारी लॉन्च झाला. यावेळी कपूर कुटूंबातील जास्तीत जास्त सदस्य उपस्थित होते. इव्हेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जान्हवी कपूर अनिल कपूर यांचे पाय पडताना दिसतेय. अनिलने पुतणीला पाहताच तिला आशिर्वाद दिले. तर दूसरीकडे जान्हवीच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बहीण खुशीला आईची आठवण आली आणि ती भावुक झाली. बहीण खुशीला भावुक झालेले पाहून जान्हवी तात्काळ तिच्याजवळ गेली आणि आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसले. 


ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचेले कपूर कुटूंबीय
धडकच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कपूर कुटूबातील जास्तीत जास्त लोक दिसले. बोनी कपूर, त्यांचे दोन्ही भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूरसोबतच महीप, मुलगी शनाया, मुलगा जहान आणि अनिलचा मुलगा हर्षवर्धन कपूरही दिसले. 

 

कपूर कुटूंबातील हे मेंबर दिसले नाही
कपूर कुटूंबातून सोनम, अर्जुन, रिया आणि अंशुला कपूर दिसले नाहीत. सध्या सोनम पती आनंदसोबत लंडनमध्ये आहे. तिने आपला 33 वाढदिवसही तिथेच सेलिब्रेट केला. सोनमची लहान बहीण रिया कपूरही त्यांच्यासोबत तिकडेच आहे. अर्जुन कपूर आपल्या 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये आहे.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इव्हेंटचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...