आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या फिटनेस चॅलेंजच्या उत्तरात अनुष्काने शेअर केला व्हिडिओ, दीपिका-वरुणला दिले चॅलेंज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या जबरदस्त फिटनेसाठी ओळखला जातो. नुकताच त्याने क्रेंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचे फिटनेस चॅलेंज एक्सेप्ट केले. यानंतर त्याने बायको अनुष्का शर्माला आपले चॅलेंज दिले. अनुष्कानेही विराटचे चॅलेंज स्विकारत एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तिने मैत्रिण दीपिका   पल्लीकल आणि वरुण धवणला चॅलेंज दिलेय. आज आम्ही सांगणार आहोत की, अनुष्का शर्मा स्वतःला कसे फिट ठेवते. फिटनेससाठी ती आपल्या डायट प्लान व्यतिरिक्त काय काय करते.


अनुष्काला आवडते घरातील जेवण
वुमेन हेल्थसंबंधीत वेबसाइट 'कॉस्मोपॉलिटल' नुसार अनुष्का शर्मा सिम्पल डायट प्लान फॉलो करते. तिला घरातील जेवण आवडते. यासोबतच ती रोज कमीत कमी 3 लीटर पाणी अवश्य पिते. तिच्या दिवसाची सुरुवात दोन अंडी आणि एक ग्लास ताज्या फळांच्या ज्यूसने होते. दुपारी ती नारळ पाणी लिंबूसोबत पनीर टोस्ट खाते. चित्रपटाच्या सेटवरही ती घरी तयार केलेले जेवण खाते. यामध्ये भाजी, वरण, दोन चपात्या आणि सलाद असते. संध्याकाळच्या नाष्ट्यामध्ये ती प्रोटीन बार किंवा फळं घेते. रात्रीचे जेवण अनुष्का घरीच करते. झोपण्यापुर्वी ती एक ग्लास दूध अवश्य घेते. ती जंक आणि ऑयली फूड्सपासून दूर राहते.


आठवड्यातून 4 दिवस वेट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग घेते
कॉस्मोपॉलिटननुसार अनुष्का नॅचुरली स्लिम आहे. ती जास्त जिम करत नाही. परंतू नियमित योगा करते. तिला वाटते की, यामुळे बॉडी फिट राहते, यासोबतच मन शांत राहते. ती आठवड्यातून 4 दिवस फक्त वेट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी जिममध्ये जाते. जर ती शूटिंगसाठी बाहेर असेल तर वॉक करते.


मेडिटेशन करणे विसरत नाही अनुष्का
एवढेच नाही तर अनुष्का सकाळी आणि रात्री झोपण्यापुर्वी मेडिटेशन अवश्य करते. यासोबतच ती डान्सला सर्वात चांगली कॉर्डियोवस्कुलर एक्सरसाइज मानते आणि रोज अर्धा तास डान्स करते. यासोबतच ती कमीत कमी 8 ते 9 तासांची झोप घेते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, अनुष्का शर्माचे एक्सरसाइज करतानाचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...