आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काचे हे असे रुप पाहिले का, अंगाचा थरकाप उडवेल परीचा नवा 'टिजर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉरर चित्रपट निवडणे हे एक आव्हान असते. अशावेळी अनुष्का शर्मा सारख्या सुंदर अभिनेत्रीने हा हॉरर चित्रपट निवडाय. अनुष्का यावर्षीच रिलीज होणा-या 'परी' या चित्रपटात भयानक अंदाजात दिसणार आहे. 'परी' या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. काही सेकंदाच्या या व्हिडिओ तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. टीजरमध्ये अनुष्का बेडवर बसून टीव्हीवर कार्टुन बघतेय...तिच्या चेह-यावर स्मित हास्य आहे. पण अचानक कॅमेरा तिच्या पायांकडे वळतो आणि तिचे पाय पाहून प्रत्येक व्यक्ती घाबरतो. 

 

'परी' अनुष्‍का शर्माच्या प्रोडक्शन हाउन क्लीन स्लेट फिल्म्सचा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रथम 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता पण जेव्हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी स्टारर 'अय्यारी'ची रिलीज डेट 26 जानेवारीपासून 9 फेब्रुवारी पुढे करण्यात आली तेव्हा अनुष्का शर्माने कोणत्याही प्रकारच्या क्लॅशपासून वाचण्यासाठी 'परी'ची रिलीज डेट पुढे केली. आता हा चित्रपट 2 मार्चला रिलीज करण्यात येईल.


अनुष्काच्या प्रोडक्शन हाउसचा पहला चित्रपट 'NH 10' 2015 साली रिलीज झाला होता. दुसरा चित्रपट 'फिल्लौरी'मध्येही अनुष्का शर्माने भूताची भूमिका केली होती. 'परी'शिवाय अनुष्का शाहरुख-कतरिनासोबत 'झिरो'चे शूटिंग करत आहे. यासोबत वरुण धवनसोबत 'सुई-धागा' या चित्रपटात ती झळकणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा अनुष्काचे टिजरमधील भयावह रुप आणि शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा भयानक टिजर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...