आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:कतरिना कैफने शेअर केला व्हिडिओ, अर्जुन कपूर म्हणाला तुला डँड्रफ झालाय का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कतरिना कैफने बुधवारी आपल्या 'मलंग' फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कतरिनाने 'पावडर अँड अर्थ' असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते खुप स्तुती करत आहेत. परंतू अर्जुन कपूरला हा व्हिडिओ आवडलेला नाही असे दिसते. अर्जुन कपूरने कमेंट करत लिहिले की, 'तुला डँड्रफ झाला आहे का कतरिना' कतरिनाच्या या फोटोशूटची सर्वांकडून प्रशंसा होतेय.


वरुण आणि अर्जुनने सुरु केला होता 'आय हेट कतरीना क्लब'
सोनम कपूरने कतरिनाचा हा व्हिडिओ पाहून म्हटले की, पागल! किती इम्प्रेसिव्ह आहे.! तर करण जोहरने स्तुती करत लिहिले की, व्हेरी हॉट! कतरिना कैफने कॉफी विद करणच्या सीजन 5 मध्ये म्हटले होते की, वरुण धवन आणि अर्जुन कपूरने तिच्यासाठी आय हेट कतरिना क्लब सुरु केला होता. कतरिनानुसार, वरुणने हा क्लब का सुरु केला आणि अर्जुने का जॉइन केला हे मला माहिती नाही.


'धूम 3' मधील 'मलंग' गाण्याची आठवण करुन देते हे फोटोशूट 
कतरिनाचे हे फोटोशूट फोटोग्राफर तरुण विश्वाने क्लिक केले आहे. हे फोटोशूट कतरिना आणि आमिर खानच्या 'धूम 3' मधील 'मलंग' गाण्याची आठवण करुन देते. त्या गाण्यात कतरिनाचे जसे डान्स मूव्ह होते. तिचा तसाच अंदाज या फोटोशूटमध्ये दिसतोय. कामाविषयी बोलायचे झाले तर कतरिना कैफ शाहरुख खानचा चित्रपट 'झिरो'मध्ये दिसणार आहे. यासोबतच या वर्षाच्या शेवटी रिलीज होणा-या आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...