आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:'धडक'मध्ये ईशानने मागितला पप्पी, रिअल लाइफमध्ये पुर्ण झाली त्याची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते दोघं एका पप्पीसोबत (कुत्र्याचं पिल्लू) दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघं खुप एक्सायटेड दिसत आहेत. यामध्ये जान्हवी म्हणतेय की, "मधुला पप्पी मिळाला." यानंतर ईशान म्हणतो की, त्याची इच्छा पुर्ण झाली. या दोघांच्या बोलण्याचे कनेक्शन आगामी चित्रपट 'धडक'शी आहे. चित्रपटात ईशानचे नाव मधु आहे तर जान्हवीचे नाव पार्थिवी आहे. एका डायलॉगमध्ये मधु म्हणतो की, "मणे एक पप्पी जाहिए" उत्तरात पार्थिवी विचारते की, "पप्पी... मतलब कुत्ते का छोटा बच्चा?" 
ईशानने व्हिडिओमध्ये सांगितले की, त्यांना खरा पप्पी कुठून मिळाला. त्याने सांगितले की, 'धडक'च्या प्रमोशनसाठी 'इंडियाज बेस्ट ड्रामोबाज'च्या सेटवर गेलो होतो. तेव्हा हा पप्पी मिळाला आणि त्याला आम्ही सोबत घेऊन आलो. 'धडक' हा जान्हवीचा डेब्यू चित्रपट आहे. 20 जुलै रोजी चित्रपट रिलीज होईल. ईशानने यापुर्वी डायरेक्टर माजिद मजीदीच्या 'बियॉन्ड द क्लाउड' चित्रपटातून अॅक्टिंग डेब्यू केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...