आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhadak Title Track Released Title Song : ‘धडक’च्या गाण्यात दिसली इशान जान्हवीची रोमँटिक केमिस्ट्री

Title Song : ‘धडक’च्या गाण्यात दिसली इशान-जान्हवीची रोमँटिक केमिस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘धडक’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी  चित्रपटातील ‘धडक है ना’ हे शीर्षक गीत स्वरबद्ध केलंय. अमिताभ भट्टाचार्य याने लिहिलेल्या या गाण्यात जान्हवी आणि इशानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळत आहे. प्रेमात पडल्यानंतरचा प्रत्येक भाव या गाण्यात दिग्दर्शक शशांक खैतानने अगदी अचूकपणे टीपल्याचं पाहायला मिळत आहे.  नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा ‘धडक’ हा हिंदी रिमेक असू नया चित्रपटाविषयी कलाविश्वात बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या 20 जुलै रोजी  हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 

पुढील स्लाईडवर बघा, गाण्याचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...