आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनिकांतचा जावई पहिल्यांदाच झळकणार हॉलिवूड चित्रपटात, रिलीज झाला ट्रेलर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिध्द अभिनेचे रजनिकांत यांचा जावई धनुष लवकरच हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातून तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि तामिळमध्ये रिलीज होतोय. 'TheExtraOrdinaryJourneyOfTheFakir' हे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. 30 मे 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपाटा ट्रेलरही रिलीज झालाय. वयाच्या 16 व्या वर्षी धनुषने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'थुल्लुवाधो इलामाई' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. साऊथसोबतच तो 'रांझणा' आणि 'षमिताभ' या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकला आहे. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. 

 

कोलावरी डी गाण्यातून झाला प्रसिध्द
- 'कोलावरी डी' या गाण्याने प्रसिद्धी एकवटणा-या धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते. तर गाण्याच्या रेकॉर्डिंगला 35 मिनिटांचा कालावधी लागला होता.
 धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. 
 
बॉलिवूड चित्रपट
धनुषला पूर्वी हिंदी नीट बोलता येत नव्हते. मात्र त्याने आपल्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या 'रांझणा' या सिनेमात धनुष पहिल्यांदा हिंदी सिनेमात झळकला होता. 2013 मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमानंतर तो अमिताभ बच्चनसोबत 'षमिताभ' या सिनेमात दिसला.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या आगामि चित्रपटाचे पोस्टर्स आणि INSIDE PHOROS....शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन बघा ट्रेलर....

बातम्या आणखी आहेत...