आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanju Manyata Aka Ranbir Kapoor On Screen Wife Diya Mirza Shared Unheard Interaction With Sanjay Dutt

'Sanju'च्या 'मान्यता'ने शेअर केला किस्सा, संजयने दिली होती त्याच्या जिममध्ये वर्कआउट करण्याची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : रणबीर कपूर स्टारर चित्रपट 'संजू'ने 4 दिवसात जवळपास 150 कोटींची कमाई केली आहे. या काळात चित्रपटातील रणबीरची पत्नी म्हणजेच मान्यता दत्तची भूमिका साकारणा-या दीया मिर्जाने आमच्या प्रतिनिधीशी खास बातचीत केली. याच वेळी दीयाने सांगितले की, तिने संजय दत्तसोबत 5-6 चित्रपट केले आहेत. तिने सांगितले की, मान्यताच्या भूमिकेसाठी मला चेह-यावर फक्त तीळ लाववा लागला आणि केस डाय करावे लागले. यावेळी तिने संजयसोबतचा एक किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत चित्रपटात काम करत होते, तेव्हा ते मला म्हणाले की, तु जिम कुठे करते, खुप फिट दिसतेय. यावर मी सांगितले की, एका मॉलमध्ये जिम करते. यावर संजय बोलला की, अशा अनोळखी ठिकाणी जिममध्ये जाण्याची गरज नाही. तु माझ्या घराच्या आउटहाउसमधील जिममध्ये येऊन वर्कआउट करत जा. यासोबतच दीयाने रणबीरच्या काम करण्याच्या पध्दतीला बुध्दची पदवी दिली.
पाहा हा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...