आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​ग्लॅमरस लूकमध्ये ऐश्वर्याने केला डान्स, 'फन्ने खां'चे 'जवां है मोहब्बत...' गाणे रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'फन्ने खां' चित्रपटातील नवीन गाणे 'जवां है मोहब्बत...' हे गाणे बुधवारी रिलीज झाले. या गाण्यात ऐश्वर्या राय ग्लॅमरस लूकमध्ये सिजलिंग डान्स करताना दिसतेय. गाण्यात ऐश्वर्या गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. गाण्यात तिचा एनर्जीयुक्त दिसतेय. चित्रपटात ती रॉकस्टारच्या भूमिकेत आहे. चित्रपटात तिचे नाव बेबी सिंह आहे. 'जवां है मोहब्बत...' हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे. हे गाणे इर्शाद कामिलने लिहिले आहे आणि संगीत तनिष्क बागचीने दिले आहे. चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार प्रमुख भूमिकेत आहेत. 'फन्ने खां' एक अशा वडिलांची कथा आहे जे स्वतः जास्त काही करु शकले नाही. परंतू त्यांना आपल्या मुलीला एक जबरदस्त सिंगर बनवायचे आहे. 3 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. डायरेक्टर अतुल मांजरेकर हा या चित्रपटाचे डायरेक्शन करत आहेत.

 

पाहा हे गाणे...

बातम्या आणखी आहेत...