Home | News | Fanney Khan New Song Halka Halka Released,Aishwarya And Rajkummar Rao Seen In Romantic Mood

Song: 'फन्ने खां'चे नवीन गाणे रिलीज, 10 वर्षे लहान राजकुमार रावसोबत ऐश्वर्याची रोमँटिक केमेस्ट्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 15, 2018, 10:50 AM IST

'फन्ने खां'चे दूसरे गाणे 'हल्का हल्का सुरुर' रिलीज झाले आहे. हा एक रोमँटिक नंबर आहे. हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे.

 • बॉलिवूड डेस्क: 'फन्ने खां'चे दूसरे गाणे 'हल्का हल्का सुरुर' रिलीज झाले आहे. हा एक रोमँटिक नंबर आहे. हे गाणे सुनिधी चौहानने गायले आहे. यामध्ये नुसरत फतेह अली खानची कव्वाली 'ये जो हल्का हल्का सुरुर है' एका वेगळ्या अंदाजात समोर आली आहे. या गाण्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार रावची रोमँटिक केमिस्ट्री दिसतेय.


  - राजकुमार ऐश्वर्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ऐश्वर्या 44 वर्षांची आहे तर राजकुमार 33 वर्षांचा आहे. चित्रपटात ऐश्वर्या पॉप स्टार बेबी सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला अनिल कपूर आणि राजकुमार राव किडनॅप करतात.
  - चित्रपटाचे डायरेक्शन अतुल मांजरेकर यांनी केले आहे. प्रोडक्शन भूषण कुमार, राकेश ओमप्रकाश मेहरा, पीएस भारती, राजीव टंडन, कृष्ण कुमार सुरुम अरोरा आणि निशात पिट्टीने केले आहे. चित्रपटात अनिल कपूरसोबत दिव्या दत्ताही आहेत. जी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.


  18 वर्षांनंतर अनिल आणि ऐश दिसणार एकत्र
  अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन 18 वर्षांनंतर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यापुर्वी दोघांनी 1999 मध्ये सुभाषा घईच्या 'ताल' चित्रपटात आणि 2000 मध्ये सतीश कौशिकसोबत 'हमारा दिल आपके पास है'मध्ये एकत्र काम केले होते.

 • Fanney Khan New Song Halka Halka Released,Aishwarya And Rajkummar Rao Seen In Romantic Mood
 • Fanney Khan New Song Halka Halka Released,Aishwarya And Rajkummar Rao Seen In Romantic Mood

Trending