आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Spotted: दिर्घकाळानंतर दिसला 44 वर्षांचा फरदीन खान, ओळखणेही झाले कठीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता फरदीन खान दिर्घकाळानंतर रविवारी मुंबई एयरपोर्टवर स्पॉट झाला. 44 वर्षांच्या फरदीनचा लूक खुप बदललेला दिसला. तो खुप सडपातळ दिसला. यावेळी त्याने ब्लॅक जॅकेट आणि ट्राउजर घातलेली होती. याचा एक व्हिडिओही सोशल मीडयावर व्हायरल होतोय. यामध्ये तो घाईमध्ये एयरपोर्टवरुन बाहेर पडतो. फरदीन गेल्या 8 वर्षांपासून सिल्वर स्क्रीनपासून दूर आहे. तो शेवटच्या वेळी 2010 मध्ये आलेल्या 'दुल्हा मिय गया' मध्ये दिसला होता. त्याचे बॉलिवूड करिअर सुपरफ्लॉप ठरले. 

 

वयाच्या 24 व्या वर्षी केला होता डेब्यू
- फरदीन खानने वयाच्या 24 व्या वर्षी 1988 मध्ये आलेल्या 'प्रेम अगन' मधून डेब्यू केला होता. यानंतर त्याने 'जंगल' (2000), 'प्यार तूने क्या किया' (2000), 'हम हो गए आपके' (2001), 'खुशी' (2002), 'देव' (2004), 'प्यारे मोहन' (2005), 'लाइफ पार्टनर' (2009)  सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
- फरदीनचे वडील फिरोज खानने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. परंतू फरदीन वडीलांची उंची गाठू शकला नाही.
- फरदीनने गतकाळातील अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानीसोबत 2005 मध्ये लग्न केले होते.
 

 

बातम्या आणखी आहेत...