आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले \'हेट स्टोरी 4\' चे नवीन गाणे, पुन्हा दिसला उर्वशीचा रोमँटिक अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : डायरेक्टर विशाल पंड्याच्या 'हेट स्टोरी 4' चित्रपटाचे 'बूंद-बूंद में गुम सा है' हे  दुसरे गाणे रिलीज झालेय. या गाण्यात उर्वशी रौतेला आणि विवान भटेनाची रोमँटिक केमेस्ट्री पाहायला मिळतेय. हे गाणे जुबिन नौटियाल आणि नीति मोहन यांनी गायले आहे. तर मनोज मुंतशिर यांचे शब्द आहेत. गाण्याचे म्यूझिक अरको प्रवो मुखर्जी यांनी दिलेय. या चित्रपटात उर्वशीसोबत गुलशन ग्रोवर, करण वाही, विवान भटेना आणि इहाना ढिल्लन प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा दोन भावांच्या वादावर आहे. या मुलांच्या वडिलांची भूमिका गुलशन ग्रोवर करत आहेत. चित्रपटात उर्वशी रौतेला हॉट अवतारात दिसतेय.

 

- 2013 मध्ये सनी देओलच्या अपोजिट 'सिंह साहब दि ग्रेट' या चित्रपटातून उर्वशी रौतेलाने बॉलिवूड डेब्यू केला होता. आता ती ''हेट स्टोरी 4 ची लीड अॅक्ट्रेस आहे.
- चित्रपटात उर्वशीची हॉट अंदाज पाहायला मिळतो. चित्रपटाच्या कथेनुसार ती दोन्ही भावांसोबत रोमँन्स करताना दिसतेय.
- उर्वशीमुळे दोन्ही भावांमध्ये भांडण होतात. असे या स्टोरीमध्ये दिसतेय. चित्रपट 9 मार्चला रिलीज होईल.

 

हेट स्टोरी सीरीजचा चौथा चित्रपट
- 'हेट स्टोरी' सीरीजचा हा चौथा चित्रपट आहे. विशाल पंड्या दूस-या आणि तिस-या पार्ट्सनंतर चौध्या पार्टचे डायरेक्टरच्या रुपात पडद्यावर परतत आहेत.
- चित्रपटाच्या पहिल्या पार्टचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्रीने केले होते. यामध्ये बंगाली अभिनेत्री पाउली डॅमसोबत असलेल्या सेक्स सीन्सवर खुप कॉन्ट्रोवर्सी झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'बूंद-बूंद' या गाण्याती उर्वशी रौतेला आणि विवानचा रोमँटिक अंदाज... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा गाण्याचा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...