आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Happybirthday Neetu Kapoor Who Celebrated Her Birthday With Family In Paris After Sanju Success

Video: कपूर कुटूंबीयांनी पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला नीतू सिंहचा वाढदिवस, सोबत नव्हती आलिया भट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुबई : गतकाळातील अभिनेत्री नीतू सिंहने आपला 60 वा वाढदिवश कुटूंबासोबत सेलिब्रेट केला. नीतूसोबत नवरा ऋषी कपूर, मुलगा रणबीर कपूर, मुलगी रिध्दिमा कपूर, जावई भरत साहनी, सासू कृष्णा राज कपूर आणि नात समायरा होते. नीतू सिंहच्या वाढदिवसाला आलिया भट्ट जाणार असे वृत्त होते. परंतू आलिया दिसली नाही. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये नीतू कपूरचे कुटूंबीय नीतूसाठी हॅपी बर्थडे साँग म्हणाताना दिसत आहेत. नीतू केक कापत आहेत. 


वयाच्या 8 व्या वर्षी नीतू सिंहने केली अॅक्टिंग करिअरची सुरुवात
- नीतू सिंह यांनी आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 8 व्या वर्षापासून केली होती. त्यांना बेबी सोनिया या नावाने ओळखले जात होते.
- 1966 मध्ये त्यांनी 'सूरज' चित्रपटातून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. यासोबतच त्यांनी  'दो कलियां', 'पवित्र पापी', 'वारिस' सारख्या चित्रपटात चाइल्ड आर्टिस्टची भूमिका साकारली. 
- वयाच्या 15 वर्षी त्यांनी 'रिक्शावाला' चित्रपटातून लीड अॅक्ट्रेस म्हणून चित्रपटाच डेब्यू केला होता.
- 1973 ते 1983 च्या काळात त्यांनी जवळपास 50 चित्रपटात लीड अॅक्ट्रेस म्हणून काम केले. 1983 मध्ये त्यांनी ऋषी कपूरसोबत लग्न केले आणि चित्रपटातून ब्रेक घेतला. 
- नीतू यांचा मुलगा रणबीरचा 'संजू' चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान कमाई करत आहेत. या चित्रपतील रणबीरच्या अभिनयाची सगळीकडे प्रशंसा होतेय.
- रणबीरचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' आहे, यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट आहे. अयान मुखर्जी हा चित्रपट डायरेक्ट करत आहेत. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 

 

बातम्या आणखी आहेत...