आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्मिळ आजाराचा सामना करत असणा-या इरफानच्या नवीन चित्रपटाच ट्रेलर रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इरफान खानचा आगामी हॉलिवूड चित्रपट 'Puzzle'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये मिडलाइफ क्रायसिस ड्रामा दाखवण्यात आला आहे. हे पाहिल्यानंतर कळते की, चित्रपटाची कथा एका हाउसवाइफच्या भोवती फिरते. इरफान एका पज्लरच्या भूमिकेत आहे. एक प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने त्याची भेट त्या हाउसवाइफसोबत होते. इरफान शेवटच्या वेळी 'ब्लॅकमेल' या बॉलिवूड चित्रपटात दिसला होता.

 

आजारी इरफान लंडनमध्ये घेत आहे उपचार 
- चित्रपटाचा लीड अॅक्टर इरफान खान सध्या न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर या दुर्मिळ आजारामुळे त्रस्त आहे. यावर उपचार करण्यासाठी तो महिनाभरापुर्वीच लंडनला गेला होता. तिथून त्याने आपल्या फॅन्ससाठी मॅसेजही सोडला होता. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले, "देव आपल्या सर्वांसोबत बोलतो, त्याने आपल्याला बनवले आहे. मग तो रात्रीच्या अंधारात मुकाट्याने आपल्यासोबत चालतो. हे शब्द आपण ऐकत असतो. आयुष्यात चांगले किंवा वाईट काहीही होऊ द्या. कारण भावना या अंत नाही. याच्या आजुबाजूला जे आहे त्याला जीवन म्हणतात." यानंतर काहीच अपडेट आलेले नाही. 
- काही दिवसांपुर्वी अफवा होत्या की, इरफानचे तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे. परंतू स्पोकपर्सनने या गोष्टी फेटाळून लावल्या आणि लोकांना अपील केली की, इरफानने लवकर ठिक व्हावे यासाठी प्रार्थना केली.


काय असतो न्यूरो एंडोक्राइन ट्युमर... 

न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा एक जीवघेणा आजार आहे. या आजाराचे मोठे लक्षण हे डायरिया असते. जर एखाद्या व्यक्तीला 20 ते 25 दिवस सतत हागवण लागली असेल, तर त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. हा आजार अनुवांशिक कारणांमुळेही होतो. कुटुंबात जर आईवडिलांना हा आजार असले, तर तो मुलांना होण्याची दाट शक्यता असते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता नव्या चित्रपटाच्या ट्रेलचे इरफानचे काही फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...