आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीसाठी मागे लागला माथेफिरु फॅन, जान्हवीला सुरक्षित कारपर्यंत घेऊन गेला ईशान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर गुरुवारी मूव्ही डेटव गेले होते. दोघंही मुंबईच्या जुहू मल्टीप्लेक्सच्या बाहेर चित्रपट झाल्यानंतर आले, तेव्हा काही फॅन्सने त्यांना घेरले. फॅन्सला जान्हवी आणि ईशानसोबत सेल्फी घ्यायचा होता. तेव्हाच एक मुलगा सेल्फी घेण्यासाठी जान्हवीच्या मागे लागला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक मुलगा सेल्फी घेण्यासाठी जान्हवीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओमध्ये ईशान, जान्हवीला प्रोटेक्ट करताना दिसतोय. एवढेच नाही तर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणा-या मुलाला ईशान धक्का देऊन दूरही करतो. परंतू तो मात्र दूर होत नाही. तो मुलगा कार येईपर्यंत जान्हवीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. जान्हवी गेल्यानंतर ईशान स्वतः त्या फॅनसोबत सेल्फी क्लिक करतो. ईशान-जान्हवी 'धडक' चित्रपटातून डेब्यू करत आहेत. डायरेक्टर शशांक खेतानचा हा चित्रपट 20 जुलैला रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...