आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झिंगाट..' गाण्यात दिसली जान्हवी-ईशानची शानदार केमिस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा आगामी चित्रपट 'धडक' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरसोबत चित्रपटाचे 'झिंगाट..' गाण्याचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये जान्हवी-ईशानची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळतेय. यामध्ये दोघंही मस्तीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. जान्हवी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. तर ईशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे. तर चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतान आहेत. 20 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैराट'चा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातील 'झिंगाट' हे गाणे मराठी चित्रपटातून घेण्यात आले आहे. हे गाणे फराह खानने कोरियोग्राफ केले आहे. या गाण्यासाठी प्रोड्यूसर करण जोहरने 'सैराट' चित्रपटाचा डायरेक्टर नागराज मंजूळेची भेट घेतली होती.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...