आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याने बॉलिवूडला दिले योगदान आज पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर गातोय गाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर सध्या एका वृद्ध गायकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गळ्यात हार्मोनियम लटकवून ही वृद्ध व्यक्ती रस्त्यांवर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह भागवतेय. त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यांवर भटकत असते. पोटापाण्यासाठी या वयोवृद्ध दाम्पत्यावर रस्त्यांवर गाणी गाण्याची वेळ आली आहे. आम्ही सांगतोय ते गतकाळातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक केशव लाल यांच्याविषयी.

 

सोशल मीडियावर केशवलाल यांचे काही व्हिडिओज समोर आले असून त्यामध्ये त्यांनी एकेकाळी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शांताराम यांच्यासोबत काम केल्याचे सांगितले आहे. हेमंत कुमार यांच्यासोबतही त्यांनी काम केल्याचे म्हटले आहे. पण आज दुर्दैवाने या संगीतकाराला वयाच्या 81 व्या वर्षी हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय. पुणे-मुंबईच्या रस्त्यांवर हे दाम्पत्य गाणी गाऊन पैसा मिळवत आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, केशवलाल यांच्या संघर्षाविषयी...

बातम्या आणखी आहेत...