आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanjuचा क्लायमॅक्स सीन लीक, रणबीरमुळे झाले संजय दत्तच्या सुटकेच्या क्षणांचे स्मरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या  'संजू' या चित्रपटातील क्लायमॅक्स सीन सोशल मीडियावर लीक झाला आहे. या सीनमध्ये संजय दत्तच्या भूमिकेतील रणबीर कपूर येरवडा तुुरुंगातून बाहेर येताना दिसतोय. रणबीरच्या हातात सामानाची एक बॅग आणि काही फाइल्स दिसत आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो तिरंग्याला सलाम करताना दिसतोय. हे दृश्य हुबेहुब संजय दत्तच्या सुटकेच्या वेळी बघायला मिळाले होते. 25 फेब्रुवारी 2016 रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून बाहेर पडताना संजय अगदी याच रुपात दिसला होता. येथून तो 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर पडला होता. त्याला पाच वर्षांचा कारावास झाला होता. 21 मार्च 2013 ला त्याला शिक्षा सुनावली गेली होती. त्याची शिक्षा मे 2016 मध्ये संपणार होती. पण तुरुंगातील त्याची चांगली वर्तणूक बघून त्याला वेळेआधी मुक्त करण्यात आले होते.  

बातम्या आणखी आहेत...