आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी मॉडेलने Ramp Walk करताना केले Breastfeed; जगभरातून होतेय कौतुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेत रॅम्प वॉक करणारी मारा मार्टिन ही मॉडेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॉडेल माराने अमेरिकेतील फॅशन शो दरम्यान रॅम्प वॉक करताना आपल्या 5 महिन्यांच्या मुलीला दूध पाजले आहे. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझीनने हा फॅशन शो आयोजित केला होता. त्यामध्ये माराने कॅटवॉक करताना ब्रेस्ट फीडिंग केले. मारा मार्टिन स्विम सर्च शोच्या 16 फायनलिस्ट्सपैकी एक होती. aceshowbiz.com च्या वृत्तानुसार, वॉक करताना माराने गोल्डन टू-पीस बिकिनी घातली होती. आपल्या मुलीला कुशीत घेऊन रॅम्पवर उतरली तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कळकळाटाने तिचे स्वागत केले. हा रॅम्पवॉक मॅगझीनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा शेअर केला आहे. त्या व्हिडिओवर लोकांनी या मॉडेलला 'अमेझिंग मम्मा' असे संबोधले आहे.


आम्ही हेडलाइन बनलो, विश्वास बसत नाही
जगभरात होणाऱ्या कौतुकानंतर या मॉडेलने आपली प्रतिक्रिया दिली. आपण आणि आपली 5 महिन्यांची मुलगी हेडलाईन होऊ याची कल्पनाही केली नाही. अजुनही आपल्याला विश्वास बसत नाही. सार्वजनिक ठिकाणी ब्रेस्टफीड सामान्य करण्याच्या हेतूने आता सर्वच महिला पुढाकार घेतली अशी अपेक्षा करते. असे तिने लिहिले. मुळात, हा फॅशन शो सार्वजनिक ठिकाणी महिलांना ब्रेस्टफीडिंग करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागरुक करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. 


सार्वजनिक ठिकाणी ब्रेस्टफीडिंगवर जागरुकता वाढली
यापूर्वी मार्च 2018 मध्ये मल्याळम अॅक्ट्रेस गिलू जोसेफने एका मुलाला ब्रेस्टफीड करताना फोटोशूट केले होते. हा फोटोशूट 'गृहलक्ष्मी' मॅगझीनने आपल्या कव्हर पेजवर छापला होता. त्या फोटोखाली एक कॅप्शन होते, की केरळच्या मातांनो लोकांना सांगा प्लीझ एकटक पाहू नका, आम्हाला ब्रेस्टफीड करायचे आहे. या फोटोवर वकील मॅथ्यू विल्सन केरळच्या कोल्लम कोर्टात गेले होते. तसेच हा फोटो कामुक असून महिलांच्या प्रतिमेच्या विरोधात आहे अशी याचिका केली होती. तर काहींनी यावर आक्षेप घेतला होता, की ती अॅक्ट्रेस ख्रिश्चन आहे, तरीही मंगळसूत्र आणि सिंदूर कसा लावला. मात्र, कोर्टाने मॅगझीनच्या पक्षात निकाल दिला. एकाला अश्लीलता दिसत असेल तर दुसऱ्याला त्यामध्ये चांगलेपणा दिसत असेल. अश्लीलता माणसाच्या नजरेत असते असे कोर्टाने म्हटले होते.

 

पुढील स्लाइडवर पाहा, या रॅम्प वॉकचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...