आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला \'परी\' चा भयानक टीजर, इतकी भयावह दिसली अनुष्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'परी' चित्रपटाचा टीजर बुधवारी रिलिज झाला. समोर आलेल्या टिजरमध्ये अनुष्का खुप भयावह अंदाजात दिसतेय. यामध्ये अनुष्का काही ठिकाणी नॉर्मल दिसतेय तर कधी ती एका हाताने फिल्मच्या अॅक्टरचा गळा दाबून त्याला उचलताना दिसतेय. अचानक तिच्या चेह-यावर जखमांच्या खुणा दिसतात. नंतर ती स्वतःचा भयानक चेहरा पाहून पळताना दिसतेय. अनुष्काने फिल्मचा टीजर ट्विटरवर शेअर केलाय. तिने 'परी' चा टीजर शेअर करत लिहिले, 'Here’s a REMINDER. This is not a fairytale'. पहिल्या टीजरपेक्षाही जास्त भयानक आहे हा टीजर...


या चित्रपटाचा पुर्वीचा ट्रेलर यापेक्षा जास्त भयानक आहे. हा चित्रपट किती भितीदायक असेल याचा अंदाज टीजर पाहून लावला जाऊ शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केलेय. चित्रपटात अनुष्कासोबत परमब्रता चटर्जी, रजत कपूर आणि रीता बिहारी चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट 2 मार्चला रिलीज होईल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'परी' चित्रपटातील काही फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा टिजर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...