आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराचा सामना करतोय अर्जुन कपूर, परिणीती चोप्राने केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा सध्या आपल्या 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाची शूटिंग करत आहेत. यापुर्वी परिणीती आणि अर्जुन कपूर 'इश्कजादे' या चित्रपटात एकत्र दिसले होते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना पसंत पडली होती. ख-या आयुष्यातही अर्जुन आणि परिणीती चांगले फ्रेंड्स आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये परिणीती, अर्जुनला सर्वात वाईट को-स्टार म्हणतेय.


- हा एक फनी व्हिडिओ आहे. यामध्ये परिणीती अर्जुनसोबत थट्टा करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये परिणीती म्हणतेय की, फॅन्सला माहिती असावे की, हा सर्वात खराब को-स्टार आहे आणि सेल्फ ओब्सेस्ड आहे.
- परिणीतीने अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये अभिनेता सेलिब्रेशन मूडमध्ये दिसत आहेत. यामध्ये परिणीतीने लिहिले की, 'नाव - अर्जुन कपूर, वय- 4 वर्षे, आजार - खिल्ली उडवणे, उपचार - उपलब्ध नाही'
- हे रिपोस्ट करत अर्जुनने लिहिले की, अखेर परिणीतीने हार मान्य केली आणि लोकांसमोर माझी स्तुती केली.
- 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट, 'नमस्ते लंडन' ची फ्रेंचाइजी फिल्म आहे. नमस्ते इंग्लंड सोबतच हे दोघं यशराज बॅनच्या 'संदीप और पिंकी फरार' मध्ये एकत्र काम करत आहेत. हे दिबाकर बॅनर्जीने दिग्दर्शित केले आहे. 'नमस्ते इंग्लंड' याच वर्षी रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...