आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'टिप टिप बरसा पानी...' वर प्रियांका चोप्राने केला डान्स, परिणीतीनेही दिली साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्रा सध्या बॉयफ्रेंड निक जोनाससोबत गोव्यामध्ये आहे. प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चेप्राने गोवा टूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघी बहीणी अक्षय कुमारचा चित्रपट मोहराचे गाणे 'टिप टिप बरसा पाणी...'वर डान्स करताना दिसत आहेत. जवळपास 9 सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये प्रियांका आणि परिणीती चोप्रा मान्सूनमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. यापुर्वी निक जोनासनेही प्रियांकाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्या पावसात भिजताना दिसल्या होत्या. 

 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या रिलेशनशीपच्या वृत्तांनुसार निक काही दिवसांपुर्वीच मुंबईत आले आहेत. प्रियांका निकला डिनरसाठी बांद्रा येथील रेस्तरॉमध्ये घेऊन गेली होती. यावेळी तिची आई मधु चोप्राही सोबत होती. निक हा प्रियांकासोबत भारतात आला, यावरुन त्यांच्या नात्याचा पुढच्या टप्प्याचा अंदाज लावला जातोय.


प्रियांकापेक्षा 10 वर्षे लहान आहे निक जोनास...
अमेरिकी सिंगर निक जोनास प्रियांकापेक्षा 10 वर्षे लहान आहे. निक आत्ताशी 25 वर्षांचा आहे. तर प्रियांचा चोप्रा 35 वर्षांची झाली आहे. दोघांची पहिली भेट 'क्वाटिंको' टीव्ही शो दरम्यान एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.

बातम्या आणखी आहेत...