आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेस 3' चे 'सेल्फिश...' गाणे रिलीज, सलमान-बॉबीसोबत रोमान्स करताना दिसली जॅकलीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान आणि बॉबी देओलचा आगामी चित्रपट 'रेस 3' मधील ज्या गाण्याची सर्वांना प्रतिक्षा होती. ते गाणे आता रिलीज झाले आहे. गाण्यात सलमान खान, बॉबी देओल आणि जॅकलीन फर्नांडिजमध्ये लव्ह ट्रँगल दाखवण्यात आलाय. 'सेल्फिश...' असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्यात जॅकलीन फर्नांडिज सलमान   खान आणि बॉबी देओलसोबत रोमान्स करताना दिसतेय. हे पाहून असा अंदाज लावला जातोय की, चित्रपटात दोस्ती-दुश्मनीचा मसाला पाहायला मिळेल. गाण्यात डेजी शाह दाखवण्यात आली आहे. 'सेल्फिश...' गाण्याला आतिफ असलम आणि यूलिया वंतूरने आवाज दिला आहे. विशाल मिश्राने हे गाणे कम्पोज केले आहे. बॉबी देओल या चित्रपटातून कमबॅक करतोय. चित्रपटात सलमान खान जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसतोय. 15 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय. यामध्ये सलमान-बॉबीसोबतच जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, शाकिब सलीम, अनिल कपूर आणि फ्रेडी दारुवाला दिसणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर रेमो डिसूजा आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या चित्रपटातील गाणे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...