आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिका आपटेसोबत हिंदी शॉर्ट फिल्म झळकला \'परशा\', \'Lust Stories\'चा ट्रेलर रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सैराट' आणि 'एफ यू' या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता आकाश ठोसर आता हिंदी शॉर्ट फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  नेटफ्लिक्‍सने  त्यांच्या तिस-या भारतीय शॉर्ट फिल्मचा टीजर रिलीज केला असून या शॉर्ट फिल्मचे नाव 'लस्‍ट स्‍टोरी' असे आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथा आहेत. करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी हे नावाजलेले चार दिग्दर्शक या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून एकत्र आले असून त्यांनी वेगवेगळे चार विषय हाताळले आहे. या चारही कथांमध्ये आकाश ठोसर, राधिका आपटे, भूमी पेडणेकर, विक्‍की कौशल, कियारा आडवानी, मनीषा कोइराला, संजय कपूर हे नावाजलेले चेहरे झळकले आहेत.

 

अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या स्टोरीत झळकणार आकाश ठोसर...
या चार विविध स्टोरीजपैकी एक स्टोरी ही स्त्रीप्रधान आहे. राधिका आपटनेने या कथेत एका कॉलेज प्रोफेसरची भूमिका वठवली असून तिच्यासोबत आकाश ठोसर झळकला आहे. ही स्टोरी अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केली आहे.

 

झोया अख्तरच्या स्टोरीत झळकली भूमी पेडणेकर...

तर झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या कथेत अभिनेत्री भूमी पेडणेकर मोलकरणीच्या भूमिकेत झळकली आहे. ही मोलकरीण तिच्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडले. 

 

करण जोहरच्या स्टोरीत झळकले विक्की कौशल,नेहा धुपिया...
करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कथेत  कियारा आडवानी, विक्‍की कौशल आणि नेहा धूपिया दिसत आहेत.

 

दिबाकर बॅनर्जींच्या स्टोरीत मनीषा कोइराला आणि संजय कपूर... 
दिबाकर बॅनर्जींनी दिग्दर्शित केलेल्या कथेत  मनीषा कोइराला, संजय कपूर आणि जयदीप अहलावत यांनी काम केले आहे. 

 

या चारही स्टोरीजमध्ये राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोइराला आणि किया आडवाणी यांनी लीड रोल साकारला आहे. प्रेम आणि नातेसंबंधांना मॉर्डन टच देऊन या शॉर्ट फिल्ममध्ये चित्रीत करण्यात आले आहे. 


पाहुयात, या शॉर्ट फिल्ममधील कलाकारांची खास झलक छायाचित्रांमध्ये... 

 

बातम्या आणखी आहेत...