आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनींच्या ‘काला’ला कमाईचा फटका, पण चाहते जोशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांतच्या चाहत्यांनी मुंबईतील चित्रपटगृह आणि बाहेर जल्लोष केला. - Divya Marathi
रजनीकांतच्या चाहत्यांनी मुंबईतील चित्रपटगृह आणि बाहेर जल्लोष केला.

मुंबई - सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित ‘काला’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. मात्र, रजनीकांतने राजकारणात प्रवेश केल्याचा परिणाम याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर दिसला. परंतु त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला. मुंबईत भर पावसातही चाहत्यांनी ढोल ताशांच्या गजरात चित्रपटगृहात प्रवेश केला.

 

नवी मुंबईतील चित्रपटगृहाबाहेर मध्यरात्री १२ वाजेपासूनच हजारो चाहत्यांनी रांगा लावल्या होत्या. तर नियंत्रणासाठी सुमारे १०० पोलिसांचे पथक तैनात होते.  चित्रपट व्यवसायविषयक तज्ज्ञ गिरीश जोहर यांच्या मते, ‘काला’ने पहिल्या दिवशी देशभरात २५-३० कोटींच्या जवळपास गल्ला जमवला. ‘रोबोट,’ ‘कबाली’ या चित्रपटांनी ४० कोटींच्या घरात सुरुवात केली होती. पुढील आठवड्यात सलमान खानचा व हॉलीवूडच्या बड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने व्यवसायावर अधिक परिणाम होण्याची शक्यता  असल्याचे  जाणकारांनी सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रजनीकांत यांच्या 'काला' चित्रपटाच्या रिलीजच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...