आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'संजू\'चा नवीन सीन समोर, राजू हिरानीने 15 वर्षांनंतर रिक्रिएट केला \'मुन्नाभाई एमबीबीएसचा\' सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'संजू'चे डायरेक्टर राजू हिरानी यांनी चित्रपटातील एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस'चे सीन रिक्रिएट करण्यात आले होते. सीनमध्ये रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय. तो यामध्ये संजयचा डायलॉग म्हणतोय -  वो बाहर कॅजुएलिटी में कोई मरने की हालत में रहा, तो उसको फॉर्म भरना जरूरी है क्या। हा सीन रणबीरवर चित्रीत करण्यात आला आहे, परंतू याला आवाज हा संजय दत्तचाच आहे.


व्हिडिओ शेअर करत राजू हिरानी यांनी लिहिले की, आशा करतो की, तुम्हाला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चा सीन पाहून तेवढीच मजा येईल, जेवढी मजा मला 15 वर्षांनंतर हा सीन रिक्रिएट करताना आली. 'संजू' चित्रपटात रणबीरला संजय दत्तच्या भूमिकेत उतरण्यासाठी कठोर मेहनत करावी लागली. त्याची ही मेहनत चित्रपटाचे प्रत्येक पोस्टर, टीजर, ट्रेलर आणि या व्हिडिओमध्येही दिसत आहे. 


29 जूनला रिलीज होणार 'संजू'
'संजू' 29 जूनला रिलीज होत आहे. चित्रपटात रणबीरचे पालक सुनील दत्त आणि नरगिस दत्तची भूमिका परेश रावल आणि मनीषा कोइराला साकारत आहे. तर त्याच्या तिस-या पत्नीची भूमिका दीया मिर्जा साकारणार आहे. यासोबतच यामध्ये सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विक्की कौशल आणि जिम सर्वदेखील काम करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...