आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: रणवीर सिंहसोबत सदगुरु जग्गी वासुदेव यांनी केला डान्स, व्हायरल होतोय व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : रणवीर सिंहचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो सदगुरु जग्गी वासुदेवसोबत डान्स करताना दिसतोय. रणवीर हा  'सेंसिंग द फ्यूचर' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी IIM बंगलुरुमध्ये पोहोचला होता. येथे त्याने सदगुरु जग्गी वासुदेवसोबत डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ स्वतः रणवीरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत रणवीरने 'हॅप्पी डान्स' असे कॅप्शन दिले आहे. या कार्यक्रमात सदगुरु आणि रणवीरला एकत्र डान्स करायला सांगितले. तेव्हा रणवीर लगेच तयार झाला. परंतू सदगुरुने डान्स करणे माझे काम नाही असे म्हणत टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर ते तयार झाले आणि रणवीरसोबत स्टेजवर डान्स केला. रणवीरने स्टेजवर सदगुरुच्या स्टेप्स फॉलो केल्या. 

बातम्या आणखी आहेत...