आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: मुलीच्या करिअरसाठी शक्य तितके प्रयत्न करतोय सैफ अली खान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सैफ अली खानची मुलगी सारा लवकरच सुशांत सिंह राजपूतसोबत 'केदारनाथ' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. बुधवारी सैफ अली खान सारासोबत केदारनाथचे डायरेक्टर अभिषेक कपूरला भेटायला गेला. सैफ हा मुलगी साराच्या करिअरविषयी काळजीत आहे आणि तिचे करिअर चांगले असावे यासाठी शक्य तितके प्रयत्न करतोय.


  /> साराचा डेब्यू चित्रपट 'केदारनाथ' अनेक वादांमध्ये अडकला आहे. बजेटविषयी चित्रपटाला अनेक अडचणी आल्या होत्या. यासोबतच डायरेक्टर अभिषेक कपूरवर क्रिआर्ज एन्टटेन्मेंडने अनियमितता आणि निष्काळजीपणाचा आरोप लावला होता. हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला होता. यामुळे चित्रपटाला उशीर झाला. यामुळे फक्त साराच नाही तर सैफही अडचणीत होता. सैफला वाटते की, मुलगी साराचे करिअच चांगल्याप्रकारे लॉन्च व्हावे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने सांगितले की, तो मुलीच्या करिअरसाठी पुर्ण मदत करतोय. सैफने सांगितले की, त्याने करण जौहरशी बातचीत केली. यानंतर त्याने त्याच्या पुढचा चित्रपट 'सिम्बा' मध्ये साराला घेतले. 'सिम्बा' चित्रपटात रणवीर सिंह आहे. 'केदारनाथ' हा चित्रपट पहिले डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. परंतू शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटासोबत क्लॅश झाल्यामुळे मेकर्सने हा चित्रपट डिसेंबर ऐवजी 30 नोव्हेंबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वडील सैफसोबतच सारा अली खानचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...