आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Race 3 Trailer: सलमानच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अॅक्शन-डायलॉगचे दमदार पॅकेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या  बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'रेस 3' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सलमान अतिशय बिनधास्त लूकमध्ये दिसतोय. सोशल मीडियावर मंगळवार सकाळपासूनच 'रेस 3 ट्रेलर डे' ट्रेंड करतंय.  विशेष म्हणजे सलमानच्या चित्रपटांविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ नेहमीच दिसली आहे. या चित्रपटाविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. ट्रेलरमध्ये सलमान दमदार अॅक्शन करताना दिसतोय. तर त्याची को-अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिस हिचा बोल्ड लूक लक्ष वेधून घेतोय. डेजी शाहसुद्धा ट्रेलरमध्ये स्वतःची वेगळी छाप सोडते. अॅक्शन, मारधाड आणि दमदार डायलॉग ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतात.  


'रेस 3'मध्ये सलमान खानसह जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातून बॉबी देओल दमदार कमबॅक करण्यास सज्ज झालेला आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट टिप्स फिल्म्सच्या बॅनरमध्ये बनला आहे. रेमो डिसुजा दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 15 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, ट्रेलरची झलक छायाचित्रांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...