आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान यांचा मॅसेज ऐकून सेटवरच सलमानला कोसळले रडू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान आपला आगामी चित्रपट 'रेस 3'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासोबतच तो सध्या '10 का दम' टीव्ही शो होस्ट करत आहे. सलमान यामध्ये कंटेस्टंटसोबत मस्ती मूडमध्ये दिसतो. या शोमध्ये नेहमी मजाक-मस्तीच्या मूडमध्ये असणा-या सलमानला शोच्या सेटवरच रडू कोसळले. शो मेकर्सने सलमानचे वडील सलीम खान यांना सलमानसाठी काही मॅसेज पाठवण्याची मागणी केली होती. 


शो सुरु असताना सलीम खान यांचा हा मेसेज दाखवण्यात आला तेव्हा सलमानला आपले अश्रू अनावर झाले. सलीम या व्हिडिओ मॅसेजमध्ये म्हणाले - बाप आणि लेकाच्या नात्याचा अर्थ कुणीही सांगू शकत नाही. सलमानला प्रतिष्ठा आणि चांगले आरोग्य लाभावे हेच मी मागेल. पैसे तर आपण स्वतः कमावत असतो. वडिलांचा हा इमोशनल मेसेज ऐकून सलमानच्या डोळ्यात अश्रू तरळले. सलमान खानला जीवेमारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी विश्नोई गँगचा गँगस्टर संपत नेहराला ताब्यात घेतले आहे. नेहरा सलमानला घराच्या बालकनीतून गोळ मारल्यानंतर विदेशात पळून जाण्याचा प्लान करत होता. सलमानच्या हत्येचा कट अयशस्वी झाल्यानंतर आता त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


सलमान सध्या 'भारत' आणि 'दबंग 3' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...