आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोटपोट होऊन हसला सलमान खान, Race3 चित्रपटाच्या ट्रेलरची अशी केली फॅन्सनी थट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानने नुकतेच दस का दम शोचे दुसऱ्या सीझनचे लाँचिंग केले आहे. यावेळी सलमानचा अपकमिंग चित्रपट 'रेस 3'च्या ट्रेलरचे फॅन्सनी तयार केलेले फनी वर्जन दाखवण्यात आले. विशेश म्हणजे रागीट स्वभावाने सर्वांना परिचीत असलेल्या सलमान खानला त्याच्या या चित्रपटाचे फनी ट्रेलर पाहून राग नव्हे तर जाम हसू आले आणि तो ट्रेलर पाहताना अगदी मोठमोठ्याने हसत होता.  

 

खासकरुन डेजी शाहच्या स्वतःचा स्कर्ट कापण्याच्या आणि 'आवर बिजनेस इज आवर बिजनेस, नॉन ऑफ योर बिजनेस' या सीनचे केलेले रिक्रिएशन पाहून सलमान जाम हसला. 4 जूनपासून सुरु होतोय 'दस का दम'...

 

- सलमान खानचा गेम शो 'दस का दम'चा चौथा सीझन 4 जूनपासून सुरु होणार आहे. पहिला सीझन 2008 साली आले होते आणि सलमानने या शोद्वारे टीव्ही डेब्यू केला होता. सलमान खानचा चित्रपट पेस 3 येत्या 15 जूनला रिलीज होणार आहे आणि रेमो डिसूजाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमानसोबत बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडीज, अनिल कपूर, डेजी शाह आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लोटपोट हसतानाचा सलमान खानचा व्हिडिओ..

 

बातम्या आणखी आहेत...