आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanju Costume Designer Talks About Ranbir Kapoor Look In Movie Sanju मध्ये रणबीरला हुबेहुब संजय दत्तसारखा दाखवण्यामागे आहे या तरुणीचा हात

Sanju मध्ये रणबीरला हुबेहुब संजय दत्तसारखा दाखवण्यामागे आहे या तरुणीचा हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्तचा बायोपिक 'संजू' येत्या 29 जून रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका वठवतोय. अनेक सीन्समध्ये रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय. मेकअप, देहबोलीसोबतच रणबीर हुबेहुब संजयसारखा दिसण्यामागे कॉश्च्युमची महत्त्वाची भूमिका आहे. अलीकडेच DainikBhaskar.com ने या चित्रपटाची कॉश्च्युम डिझायनर एका लखानीसोबत खास बातचित केली. बातचितमध्ये एकाने सांगितले की, रणबीरची हाइट संजय दत्त एवढी दावण्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा हीलची मदत घेतली. 

 

चित्रपट आणि छायाचित्रांच्या मदतीने बनवले संजय दत्तच्या प्रत्येक काळातील कॉश्च्युम... 
- एकाने सांगितल्यानुसार, बायोपिकमध्ये रणबीरला हुबेहुब संजय दत्तसारखे दाखवणे सोपे नव्हते. यामध्ये  हेअर स्टायलिंग, मेकअप आणि वार्डरोबपासून लायटिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीची महत्त्वाची भूमिका राहिली. एका म्हणाली, "आम्ही संजय दत्तचा लाइफ ग्राफ बघितला आहे. त्याची स्टाइल चित्रपटात दाखवण्यासाठी आम्ही फॅमिली फोटोग्राफ्सची मदत घेतली. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी संजय लेद जॅकेट्स वापरत असे. त्यामुळे आम्ही लेदर जॅकेट्सचा वापर केला. 80 च्या दशकात कलर ब्लॉकिंग बघायला मिळत होती. त्यामुळे आम्हाला कलर्सवर विशेष लक्ष द्यावे लागले. त्याकाळात संजय दत्त सडपातळ होता. त्यामुळे त्याच्या शरीरयष्टीप्रमाणे कपडे तयार केले. 90 च्या दशकातील काळ दाखवण्यासाठी आम्ही संजयच्या चित्रपटांना फॉलो केले.'

 

संजय दत्तच्या एक्सेसरीजचा केला वापर 
- एकाने  सांगितले की, रणबीरसाठी चित्रपटात आम्ही संजय दत्तच्या एक्सेसरीजचा वापर केला. उदाहरणार्थ संजय दत्तल रॉलेक्स घड्याळ घालणे पसंत आहे. त्यामुळे रणबीरसाठी अनेक रॉलेक्स घड्याळी मागवण्यात आल्या. याशिवाय वेगवेगळ्या काळात संजयने घातलेल्या रिंग्स रणबीरने घातल्या आहेत. संजूचे शूज आयकॉनिक होते. त्यामुळे तसेच शूट रणबीरसाठी इम्पोर्ट करावे लागले. रणबीरसाठी  शूजमध्ये अनेकदा एक्स्ट्रा हिल वापरावी लागली, जेणेकरुन तो संजयच्या हाइटचा दिसेल. 


या चित्रपटांसाठी एकाने केले आहे काम... 
- 'संजू' या चित्रपटाव्यतिरिक्त एकाने 'रावन' (2010), 'एन एच 10' (2015), 'हसीना पारकर' (2017), 'ओके जानू' (2017) आणि 'सूरमा' (2018, अपकमिंग) सह अनके गाजलेल्या चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटातील रणबीरचे विविध लूक...

बातम्या आणखी आहेत...