आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: \'संजू बाबा\'ने घेतला पत्रकारांचा समाचार, व्हिडिओवर होतेय टिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'संजू' हा रिलीज झाला आहे. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. या चित्रपटाच्या सर्वात शेवटी संजय दत्त आणि रणबीर कपूरचे एक गाणेही दाखवण्यात आले आहे. 'बाबा बोलता है' हे ते गाणे आहे. या गाण्याचा व्हिडिओ टी सिरिजनं नुकताच प्रदर्शित केला. या गाण्यामध्ये संजू बाबाने आणि रणबीर कपूरने पत्रकांरांचा समाचार घेतला आहे. 

 

एखादी बातमी प्रकाशित केल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात कसे वादळ येते. एखादी लहानशी गोष्ट पत्रकार मोठी करुन कसे चालवतात हे या गाण्यातून सुचकपणे सांगण्यात आले आहे. या एका वृत्तामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याची कशी सर्कस होते हे या गाण्यातून सांगण्यात आलेय. परंतू गाणं प्रदर्शित झाल्यानंतर गाण्यावर टिकाहू होत आहे. कारण या गाण्यातून पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतोय. संजयची चांगली प्रतिमा यामधून दाखवण्यात आली आहे. 

 

चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौर सुरु
बुहूप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत 'संजू' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 'संजू' हा चित्रपट यावर्षीचा रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3चा रेकॉर्ड मोडीत काढत पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 34.75 कोटींची कमाई केली. आता दूस-या दिवसापर्यंत या चित्रपटाने 73 कोटींचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार हा चित्रपट अवघ्या तीन दिवसात 100 कोटींचा आकडा ओंलांडणार असा अंदाज वर्तवला जातोय. हा राजू हिराणी आणि रणबीर कपूर यांच्या करिअरमधला पहिला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी राजू हिराणींच्या 'पीके' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26.63 कोटींची कमाई केली होती. तर रणबीरच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'बेशरम' हा होता. 'बेशरम'ची पहिल्या दिवसाची कमाई 21.56 कोटी इतकी होती.

 

बातम्या आणखी आहेत...