आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanju New Poster Presents Jaadu Ki Jhappi Between Ranbir Kapoor Paresh Rawal On Fathers Day

रिलीज झाले संजूचे नवीन पोस्टर, बाप-लेकाचे नाते पाहून व्हाल भावूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंड डेस्क : 17 जूनला जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने डायरेक्टर राजकुमार हिराणी यांनी त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'संजू'चे नवीन पोस्टर शेअर केले. परेश रावल आणि रणबीर कपूरचे हे पोस्टर आहे. पोस्टरमधून तुम्हाला बाप-लेकाचे निर्मळ आणि निस्वार्थ नात्याची झलक पाहायला मिळतेय. हा पोस्ट मुन्नाभाईच्या जादूच्या झप्पीचा सीन आहे. मुन्नाभाईमध्ये संजय दत्त यांचे वडील सुनील दत्तने संजय म्हणजेच मुन्नाभाईच्या वडिलांची भूमिका साकारली होती. संजूमध्ये हे दृश्य दाखवण्यात आले आहेत. हा फोटो शेअर करण्यासाठी फादर्स डे पेक्षा चांगला दिवस कोणताही नसू शकतो. यासोबतच याचा 20 मिनिटांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये रणबीर कपूर परेश रावल यांना जादू की झप्पी देताना दिसतोय.

बातम्या आणखी आहेत...