आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 तासांतच 1 कोटी लोकांनी पाहिले 'संजू'चे ट्रेलर, यूजर्सने आताच सांगितले 'सुपरहिट पिक्चर'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संजय दत्तचा बायोपिक संजूचे ट्रेलर रिलीज झाले आहे. फिल्ममेकर्सनी एकसोबत पाच शहरात या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले आहे. रिलीजनंतर लगेचच हे ट्रेलर यूट्युबवर ट्रेंड करत आहे. या ट्रेलरमध्ये संजय दत्तने त्याच्या पत्नीव्यतिरीक्त 350 महिलांसोबत त्याचे संबंध असल्याचे सांगितले आहे. 18 तासांतच हे ट्रेलर 1 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे. 

ट्रेलरमध्ये संजय दत्तचे वादग्रस्त आयुष्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि यातील संजय दत्तचे डायलॉग्जही सर्वांचे लक्ष वेधत आहेत. 

 

चित्रपटात परेश रावल, मनिषा कोईराला यांनी संजय दत्तचे आईवडील म्हणजेच सुनील दत्त आणि नर्गिस यांची भूमिका केली आहे. तर विकी कौशलने संजय दत्तचा लंडनमधील एका खास मित्राची भूमिका केली आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने संजयची पत्नी मान्यता आणि सोनम कपूरने संजयची एकेकाळची गर्लफ्रेंड टीना मुनीमची भूमिका केली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा. संजूचा ट्रेलर आणि काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...