आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer: भोजपुरी चित्रपट 'बैरी कंगना'मध्ये सपना चौधरीचा हिंदी आयटम नंबर, ट्रेलरमध्ये दिसली झलक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता भोजपुरी चित्रपटात आयटम नंबर करताना दिसणार आहे. रवि किशन, काजल रघवानी आणि शुभे शर्मा स्टारर 'बैरी कंगना 2' मध्ये तिचा आयटम नंबर दिसेल. विशेष म्हणजे, चित्रपट भोजपुरी असला तरीही सपना चौधरीवर चित्रीत केलेले गाणे हिंदीमध्ये असेल. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये 13 सेकंदांसाठी सपनाच्या डान्सची झकल दिसतेय. लवकरच हे गाणे यू-ट्यूबवर रिलीज केला जाणार आहे. डायरेक्टर अशोक त्रिपाठी अत्रीचा हा चित्रपट 6 जुलैला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.


बॉलिवूडमध्ये सपनाने केले आहे दोन आयटम नंबर
- सपना ही 'तेरी आंख्या का यो काजल' सारख्या हरियाणवी गाण्यातून प्रसिध्द झाली आहे. ती 'बिग बॉस 11' (2017-18) मध्ये कंटेस्टंट म्हणून दिसली होती. यानंतर तिने दोन बॉलिवूड आयटम नंबर केले.

बातम्या आणखी आहेत...