आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर शहारे आणतो गोल्डचा दूसरा टीजर, गोल्ड मेडलच्या स्वप्नाची कथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 1948 मध्ये स्वतंत्र भारतात पहिल्यांदा भारतीय टीमने हॉकीमध्ये गोल्ड जिंकला होता. या यशाची कथा अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून सांगण्यात आली आहे. 15 ऑगस्टला रिलीज होणा-या गोल्डचा दूसरा टीजर अंगावर शहारे आणणारा मॅसेज देतो. सुरुवातीला एक लाइन येते की - प्लीज स्टँड अप फॉर नॅशनल अँथम. यानंतर ब्रिटिश नॅशनल अँथम ऐकायला येते. नंतर लगेच एक मॅसेज येतो की, यावरुन तुम्हाला काय वाटते, 200 वर्षांपर्यंत आपण इंग्रजी राष्ट्रगीतासाठी उभे राहत होतो. जोपर्यंत एकट्या व्यक्तीच्या स्वप्नाने इंग्रजांना भारतीयांच्या राष्ट्रगीतात उभे राहण्यास भाग पाडले.

 

पहिल्या टीजरने बनवला रेकॉर्ड
- गोल्डचा पहिला टीजर 5 फेब्रुवारीला रिलीज करण्यात आला होता. यामध्ये अक्षय कुमार टीमला तिरंगा दाखवताना मोटिव्हेट करताना दिसत आहे. या तिरंग्यामध्ये अशोक चक्र नसते, तर चरखा बनलेला असतो.
- गोल्डचा टीजर 2018 मध्ये सर्वात जास्त वेळा पाहिला जाणारा बनला आहे. हा टीजर 24 तासांमध्ये 15 मिलियनवेळा पाहण्यात आला.

 

दूस-या टीजरमध्ये काय विशेष
- गोल्डच्या दूस-या 54 सेकंदच्या टीजरमध्ये अक्षय मैदानात इतर टीमच्या कोचसोबत उभा असतो. परंतू त्याची नजर दुसरीकडेच असते. तो आपल्या कोटच्या खिशातून तिरंगा काढताना दिसतो.
- टीजरमध्ये मॅचचे काही सीनही आहेत. यासोबतच अक्षय आगीसमोर बंगाली धोती कुर्ता परिधान करुन उभा असलेला दिसतो. दूसरा टीजरही आतापर्यंत 2 मिलिनयपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला आहे.

 

गोल्डमध्ये कोच बनला अक्षय
- हा चित्रपट भारतातील फर्स्ट ओलिंपिक गोल्ड विनर (1948) आणि हॉकी लीजेंड बलबीर सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे.
- चित्रपटात सांगण्यात आले आहे की, 1946 पर्यंत देशाने तीन गोल्ड मेडल जिंकले होते. परंतू हे ब्रिटिश इंडियाच्या नावार होते. यानंतर भारताने एकापाठोपाठ एक 1956 पर्यंत मेडल जिंकले.
- आपल्या भूमिकेसाठी अक्षयने युवराज वाल्मिकि(इंडियन हॉकी टीमचे स्ट्राइकर) आणि ऑस्ट्रेलियन कोच माइकल नॉब्स ट्रेनिंग घेतली आहे.

 

मौनी रॉयचा डेब्यू
- टीव्हीच्या नागिनच्या रुपात प्रसिध्द झालेली मौनी राय या चित्रपटातून डेब्यू करत आहे. तिच्यासोबतच या चित्रपटात कुणाल कपूर, विनीत कुमार सिंह, अमित साध आणि कौशल आहे.
- अक्षय कुमार पहिल्यांदा रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एन्टटेन्मेंटसोबत मिळून काम करत आहे.
- डायरेक्टर रीमा कागती आहे. तिने अक्षयसोबत तलाश चित्रपटात काम केले आहे.

एक्स्ट्रा शॉट्स
- भारताने हॉकीमध्ये 1946 मध्ये तीन ऑलंपिक गोल्ड मेडल जिंकले होते. परंतू ते ब्रिटिश भारताच्या नावावर होते. 
- 12 ऑगस्ट 1948 मध्ये ऑलंपिकच्या दरम्यान स्वतंत्र भारताने आपले पहिले सुवर्ण पदक जिंकले होते.

 

बातम्या आणखी आहेत...