आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: श्रीदेवीची लहान मुलगी खुशीचा व्हिडिओ व्हायरल, 'झिंगाट' गाण्यावर करतेय डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूरचा 'धडक' चित्रपट आज रिलीज झाला. याच काळात जान्हवीची लहान बहीण खुशीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ती 'धडक' मधील प्रसिध्द गाणे 'झिंगाट'वर डान्स करताना दिसतेय. विशेष म्हणजे ती कारमध्ये फूल आवाजात गाणे लावून डान्स करताना दिसतेय. तर ड्रायव्हर गाडी चालवत आहे. 

 

मॉडलिंगमध्ये बनवायचे आहे करिअर
- खुशी सध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिला मॉडल बनायचे आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ती मॉडलिंगची ट्रेनिंग घेणार आहे. मॉडलिंग केल्यानंतर ती चित्रपटामध्ये करिअर बनवणार आहे.
- खुशी-जान्हवीची आई श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, खुशी चित्रपटांमध्ये येईल परंतू ती पहिले शिक्षण पुर्ण करेल. तर जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी चित्रपटात यावे असे आईला वाटत नव्हते. परंतू खुशीने चित्रपटात यावे असे तिला वाटत होते.
- जान्हवीला म्हणायचे होते की, खुशी तिच्यापेक्षा जास्त स्ट्राँग आणि इंडिपेंडेंट आहे. खुशी आईप्रमाणे जान्हवीची काळजी घेते. 

 

बातम्या आणखी आहेत...